आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहिती:20 एप्रिलनंतर काही भागांत उद्योग सुरू हाेणार - मुख्यमंत्री; सुधारित आदेश जारी, अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले

२० एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येत आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहील. यादृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. 

ते म्हणाले, कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील.  केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन ३ मेपर्यंत आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन करायचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, मास्क घालणे या बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. 

तथापि, कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...