आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:डॉलरला मजबूत करतेय महागाई; तरीही सोन्याची भाववाढ खुंटलेली, आणखी काही दिवस भाव स्थिर राहणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून सोन्याची चाल आश्चर्यकारक दिसत आहे. जगभरात महागाई झपाट्याने वाढत असतानाही सोन्याच्या भावात उसळी दिसत नाही. परंपरेनुसार महागाई वाढली तर सोन्याचे भाव वाढतात. यामुळे महागाई असतानाही नुकसान भरपाई होत होती. त्यामुळे सोन्याला महागाईपासून बचावाचे साधन (हेजिंग टूल) मानले जाते. परंतु या वेळी हा कलच बदलला आहे. म्हणजे सोन्याचे भाव स्थिर आहेत. २०२० मध्ये जागतिक महागाईचा दर ३.१८% होता, जो २०२२ मध्ये दुप्पट वाढून ७% पेक्षा अधिक झाला. अमेरिका, युरोप आणि ब्रिटनमध्ये महागाई गेल्या ४० वर्षांच्या विक्रमी स्तरावर आहे. तथापि, सोन्याचे भाव स्थिरच नाही तर २०२० मधील पीकपेक्षा सुमारे १० टक्के खाली आले आहेत.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते या वर्षी सोने १,८५० डॉलरच्या वर जाणार नाही. म्हणजेच सोन्यात ३.१७% तेजी येण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये भारतात महागाई दर ८ वर्षांतील सर्वोच्च स्तर ७.७९% वर पोहोचला होता. तो एप्रिल २०२१ मध्ये ४.२३% होता. दुसरीकडे सोन्याचे भाव केवळ ५% वाढले. २०२० ते २०२१ दरम्यान स्थानिक बाजारात सोन्याचे भाव ४८,६००-४८,७०० दरम्यान स्थिर राहिले. एमके वेल्थ मॅनेजमेंटच्या अहवालानुसार या वर्षी देशात सोन्याचे भाव ५१,५०० रुपये प्रतितोळाच्या वर जाण्याची शक्यता कमीच आहे. तो सध्या ५१,१७० रुपयांच्या जवळपास आहे.

बातम्या आणखी आहेत...