आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपाययोजना:अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी 11 तज्ज्ञ सदस्यांची समिती - अजित पवार यांची माहिती

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पर्यटन संचालनालयात विशेष कक्ष

राज्यावरील कोरोना संकटाचा सर्व स्तरांंवर प्रभावी मुकाबला करून कोरोनाला हरवणे, ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात जणांच्या मंत्रिगटाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे.

या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणा युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईला बळ देण्याचे कामही ही समिती करणार आहे.

तज्ज्ञ समिती 

तज्ज्ञ सदस्यांच्या समितीत जे. एस. सहानी, सुबोधकुमार, रमानाथ झा, उमेशचंद्र सरंगी, जयंत कावळे, सुधीर श्रीवास्तव या सहा सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश तसेच नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील

पर्यटन संचालनालयात विशेष कक्ष 

पर्यटनमंत्री अादित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार विविध पर्यटनस्थळी अडकलेल्या परदेशी पर्यटकांना सर्व मदत करण्याचे नियोजन यासाठी पर्यटन संचालनालयात एक विशेष कक्ष स्थापन. अमेरिका, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी आणि अन्य युरोपीय खंडातील विविध देशांतील तब्बल ७० पैकी ५ परदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात पाठवले, तर ६५ पर्यटकांची आरोग्य, सुरक्षेसह निवास, भोजनाची सोय केली.

बातम्या आणखी आहेत...