आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र, गुजरातेतील नागरिकांच्या माहितीची अवघ्या 66 रुपयांत विक्री:आधार कार्ड डेटा चोरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने अत्यंत सुरक्षित म्हणून घोषित केलेल्या यूआयडीएआयच्या (आधार) संगणक प्रणालीत नमूद नागरिकांची माहिती चोरून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील लोकांची गोपनीय माहिती खुल्या बाजारात केवळ ६६ रुपयांना विकली जात असल्याचे या टोळीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी निखिल सूर्यप्रकाश येलिगट्टी, मेल्वीन मोदी ऊर्फ मोल्विन ब्रिटो आणि भावेश मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. निखिल व राहुल येलिगट्टी यांना अटक केली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शासकीय संगणक प्रणालीत शिरकाव करून ही माहिती कशी चोरली जात होती याची सविस्तर माहिती चौकशीतून स्पष्ट होईल, असे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.

कोणती माहिती कुणाला विकली? आधार-मोबाइल क्रमांक, पत्ता, ई-मेल यासह इतर माहिती आरोपींनी चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. ही माहिती आरोपी वेबसाइटद्वारे बँक लोन रिकव्हरी एजन्सी-खासगी व्यक्तींना विकत होते. आतापर्यंत किती लोकांची किती जणांना माहिती विकली याचा पोलिस कसून तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...