आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील वाडिया रुग्णालयात आग लागली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे आग भडकली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. तसेच, ऑपरेशन शिएटरमधील व शिएटरजवळील सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अगनिशमन दलाचे 9 बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. एवढया मोठ्या प्रमाणात बंब दाखल झाल्याने या आगीची तीव्रता मोठी असल्याचे लक्षात येते आहे. बंद ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली होती. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालेय याबाबतची देखील स्पष्टता अजून आलेली नाही. या आगीत आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगीच्या घटनेमुळे रुग्णांमध्ये भीती पसरली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा
आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरुन आढावा घेतला आहे. तर ही आग कशामुळे लागली याची चौकशीही केली. तर अग्निशमन दलाला तातडीने आग विझविण्यासाठी सूचना देत काय प्रशासकीय मदत लागेल ते देण्याचे सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.