आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत:पीएम केअर फंडातून पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सची चौकशी करा; घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिक, औरंगाबादला मिळालेली व्हेंटिलेटर्स दुरुस्तच होईनात

पंतप्रधान सहायता निधीतून नाशिक आणि औरंगाबादेत पाठवण्यात आलेली व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आहेत. तंत्रज्ञांकडून दुरुस्त होत नसून पीएम केअर फंडातून पाठवण्यात आलेल्या या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

सावंत म्हणाले, पीएम केअर फंडातून औरंगाबादमधील घाटी रुग्णालय आणि नाशिक महानगरपालिकेला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये घोटाळा झाल्याचे दिसून आले आहे. याची राज्यस्तरीय चौकशी करा, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेली व्हेंटिलेटर्स पूर्णतः निरुपयोगी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीचे म्हणणे आहे. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकलेले नाहीत.

नाशिकमध्येही ६० व्हेंटिलेटर्स पडून
नाशिकला दिलेल्या व्हेंटिलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे. केंद्र शासनाने व्हेंटिलेटर्स पुरवल्याचा भाजपकडून मोठा गाजावाजा केला गेला होता. परंतु तब्बल ६० व्हेंटिलेटर्स अर्धवट स्थितीत होती. त्याचे सुटे भाग न मिळाल्यामुळे इन्स्टॉलेशन थांबले. तसेच जून महिन्यात पीएम केअर फंडातून पाठवण्यात आलेल्या ३५ व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स अजूनही नादुरुस्त असून संबंधित कंपनीकडून या यंत्राचे सुटे भाग प्राप्त न झाल्याने ही व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे सावंत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...