आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीची चौकशी:प्रताप सरनाईक यांनी चौकशीसाठी ईडीकडे मागितला एका आठवड्याचा वेळ, मुंबई बाहेरुन आल्याने झाले क्वारन्टाइन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरनाईक पिता-पुत्रांना आज 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरांवरही ईडीने कारवाई केली. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यांनी ईडीकडे आठवडाभराचा वेळ मागितला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण त्यांनी ईडीला आठवडाभरानंतर चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड 19 नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहे.

प्रताप सरनाईकांनी ईडीकडे विनंती केली की, मी सध्या कोविड-19 नियमानुसार क्वारंटाइन आहे. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही. तर विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सरनाईक यांच्या भागिदाराची माहिती आणि विनंती पत्र हे त्यांचे मेव्हणे ED कार्यालयात देणार असल्याचीही माहिती आहे. सरनाईक पिता-पुत्रांना आज 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser