आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’तून प्रत्येक जिल्ह्याला पुस्तकांचे संच वाटप करण्याच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना पुस्तक वाटप करण्याची नवी शक्कल लढवून बाजारात १०० रुपयांत मिळणाऱ्या पुस्तकासाठी ६०० रुपये दर आकारण्यात आले होते. अशा २१० पुस्तकांच्या एका संचासाठी तब्बल ९९ हजार ७५० रुपयांचा दर शासनाने निश्चित केला. हा प्रकार समोर येताच समाज कल्याण आयुक्तांनी हा आदेश तूर्तास रद्द केला असला तरी सूत्रधार कोण, हा प्रश्न कायम आहे. याप्रश्नी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.