आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:वीस वर्षांतील उत्पन्नाबाबत आमदार वैभव नाईकांची चौकशी

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार वैभव नाईक यांची सोमवारी रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. नाईक यांना रविवारीच चौकशीला हजार राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.

एसीबीने वैभव नाईक यांच्याकडे २००२ ते २०२२ पर्यंतच्या सर्व उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मागवला होता. या सर्व कागदपत्रांसह जबाब नोंदवण्यासाठी यावे, असे आदेश एसीबीकडून वैभव नाईक यांना देण्यात आले होते.

प्राथमिक जबाब नोंद करणे, खुल्या चौकशीसाठी पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या कार्यालयात ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे नोटीसद्वारे बजावले होते. त्यानुसार ते चौकशीसाठी हजर राहिले. दरम्यान, चौकशीचा तपशील काही कळू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...