आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याच्या संशयामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र आयफोन वापरण्याच्या कोणत्याही सूचना पक्षनेतृत्वाने दिल्या नसल्याचे गुरुवारी (२ फेब्रुवारी) स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून २०१९ च्या निवडणुकांत फोन टॅप झाल्याविषयी अधिवेशनांदरम्यान विधानसभा अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार गडगडल्यानंतर पुन्हा फोन टॅप होत असल्याचा संशय आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार, नेते बाळासाहेबांची शिवसेनेच्या गळाला लागल्याने ठाकरे गटाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. संवादासाठी अधिक सुरक्षित असलेला आयफोन वापरावा अशा सूचना थेट मातोश्रीवरून करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला. अशा कोणत्याही सूचना पक्षनेतृत्वाने दिलेल्या नाहीत. राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.