आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लॉकडाऊन:चाकरमान्यांना गणेशोत्सवात ‘कोकणबंदी’ केल्यास तीव्र आंदोलन : नारायण राणे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सरकारने लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासनाशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा'
Advertisement
Advertisement

कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचे नाते अतूट आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवात कोकणात जायला बंदी घालू नये. सरकारने अशी बंदी घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे खा. नारायण राणे यांनी शुक्रवारी दिला .

चाकरमानी मुंबईत नोकरीला असले तरी त्यांचे कुटुंब कोकणात असते. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात जात असतो. गणेशोत्सव कोकणी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. यंदा कोरोना असला तरी गणेशोत्सवात कोकणी माणसाला गावाला जायला कोणी बंदी घालू नये. अद्यापपर्यंत कोकण बंदीचे आदेश निघालेले नाहीत. आम्ही तसा आदेश निघू देणार नाही. कोकणात जायला बंदी घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला.

या वेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनवरून सुरू असलेल्या सावळ्या गोंधळावर टीकास्त्र सोडले. सरकारी यंत्रणेवर विश्वास नसल्यानेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतले जात आहेत. हे चुकीचे आहे. सरकारने लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासनाशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा. सरकारच्या या धोरणामुळे त्यांचा प्रशासनावर विश्वास नसल्याचे दिसून येते.

Advertisement
0