आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Intense Dissatisfaction In Congress Against Three Senior Leaders Who Sent Controversial Letters; Congress Leaders Say The Party Has No Recourse Without The Gandhi Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमध्ये वादंग:वादग्रस्त पत्र पाठवणाऱ्या तीन ज्येष्ठ नेत्यांविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष; गांधी कुटुंबाशिवाय पक्षाला तरणोपाय नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पृथ्वीराज चव्हाण, वासनिक, देवरांनी माफी मागावी अन्यथा त्यांना फिरू देणार नाही : केदार

राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मनीषा राज्यातील बहुतेक काँग्रेस नेत्यांची सोमवारी दिसली. तसेच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून वादग्रस्त पत्रावर सही करणाऱ्या राज्यातील काँग्रेसच्या तीन नेत्यांविरोधात मोठा असंतोष उफाळला अाहे. राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्यासह काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अशोक चव्हाण, थोरात यांचा राहुल यांना पाठिंबा

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. गांधी कुटुंबाकडेच पक्षाला एकसंध ठेवण्याची क्षमता असल्याचे सांगून राहुल यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, त्यांच्या पुरोगामी नेतृत्वाची देशाला गरज असल्याचे मत उभय नेत्यांनी व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण, वासनिक, देवरांना फिरू देणार नाही : केदार

मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद आहे. त्यांनी या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत, असे ट्वीट सुनील केदार यांनी केले होते. यावरून वादंग झाल्यावरही केदार यांनी ट्वीटवर कायम असल्याचे सांगितले.

त्रिमूर्तीविरोधात असंतोष

दोन आठवड्यांपूर्वी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ज्या २३ काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहिले होते, त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा आणि विदर्भातील काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. या तिघांविरोधात प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा रोष दिसून आला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser