आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पीएमसी बँकेप्रकरणातील आर्थिक व्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत अडचणीत आलेले आहेत. दरम्यान आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता राऊत कुटुंबाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. राऊत कुटुंबातील काही सदस्यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी करायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. 'राऊत परिवार माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ' मनी ट्रेल, कॅश ट्रेल' चौकशी झालीच पाहिजे. एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली? एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5400 कोटी रुपये चोरले आहे. पीएमसीसाठी हे महत्वाचे आहे' असे सोमय्या म्हणाले आहेत.
"राऊत परिवार" माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे HDIL शी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ' मनी ट्रेल, कॅश ट्रेल' चौकशी झालीच पाहिजे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2020
एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली?
एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ₹ 5400 कोटी चोरले आहे
PMC साठी हे महत्वाचे आहे pic.twitter.com/eY8rgMhVme
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या पत्नी वर्षा आजही अंमलबजावणी संचालनालय (ED) समोर हजर होणार नाहीत. त्यांना तिसऱ्यांचा समन्स पाठवण्यात आलेला होता. यापूर्वी दोन वेळाही त्या ईडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीला वर्षा यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या 55 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शनविषयी विचारायचे आहे.
काय आहे प्रकरण
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात प्रवीणच्या खात्यातून मोठी रक्कम आली होती. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षा यांच्या खात्यात कर्जासाठी काही रक्कम घेतल्याचे नमूद केेले आहे. हा व्यवहार ईडीला जाणून घ्यायचा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.