आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या व्यवहाराची ‘कॅग’कडून चौकशी सुरू

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी कॅगच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन व्यवहारांच्या कागदपत्रांची मागणी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी राज्य सरकारने कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या व्यवहाराची कॅगकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. कॅगच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे काही अधिकारीदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर कॅगच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या अकाउंट्स विभागात जाऊन व्यवहाराची माहिती मागितली.

बातम्या आणखी आहेत...