आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेइकल्स ट्रिटॉन कंपनी जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार करणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी ऑरिक (औरंगाबाद),पुणे आणि नागपूर असे तीन पर्याय राज्य सरकारने दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे संस्थापक हिमांशू पटेल यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायड्रोजन वाहने ही वापरण्यास किफायतशीर, सुरक्षित असून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांतील बसेस भाडेतत्त्वावर घेऊन हायड्रोजनवर चालवता येणे शक्य आहे, त्यासाठी कंपनीने सविस्तर प्रस्ताव दिल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.