आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:शेअर मार्केटमधील गुंतवणूक बेतली जीवावर, आर्थिक नुकसानीमुळे दोघांची आत्महत्या

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून आर्थिक नुकसानला कंटाळून दोन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुलुंड येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलुुंड येथील पुर्व उमा सोसायटीत राहणाऱ्या दोन तरूणांनी आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी स्वता:च्या घरात गळफास घेऊन या तरूणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

राजेश विठ्ठल कांबळी (54) आणि प्रमोदिनी रघुनाथ कांबळी (82) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे मुलुंड पूर्व येथील महात्मा फुले मार्गावरील उमा सोसायटीतील खोली क्रमांक 2 मध्ये राहत होते. घर बंद असल्याने काही दिवासानंतर शेजाऱ्यांच्या दुर्गंधी येत असल्याने तातडीने तिथे राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन करून बोलावुन घेतले.

राजेश कांवळी आणि प्रमोदिनी कांबळी यांनी 11 मार्चला आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहिली. या चिठ्ठीमध्ये शेअर बाजारातील नुकसानाला कंटाळून आम्ही आत्महत्या करत आहोत. असे या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...