आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापूजेचे निमंत्रण:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी महापूजेचे निमंत्रण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१२ जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. “वर्षा’ शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगावकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. या विश्वस्तांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. “पंढरपुरातील विकासकामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...