आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन:क्रीडा संकुले बंदची घोषणा; मुंबईतील सामन्यांबाबत अद्याप बीसीसीआयचे वेट अँड वॉच, आयपीएलबाबत निर्णय आज?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोहलीच्या बंगळुरू टीमचा युवा स्फोटक सलामीवीर फलंदाज देवदत्त कोरोनाची झाली लागण

आयपीएलला येत्या शुक्रवारपासून सुरुवात हाेणार अाहे. यापूर्वीच अाता महाराष्ट्रातील अायपीएल सामन्यांंच्या अायाेजनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले. रविवारी वीकेंड लाॅकडाऊनबाबत घाेषणा करण्यात अाली. यामध्ये क्रीडा संकुलेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला. मात्र, याच वीकेंडदरम्यान (शनिवार-रविवार) मुंबईच्या वानखेडेवर एकूण चार सामने हाेणार अाहेत. त्यामुळे या सामन्यांचे अायाेजन अडचणीत सापडले. मात्र, अद्याप महाराष्ट्र सरकारनेही अायपीएल सामन्यांबाबत ठाेस असा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे याबाबत सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीअाय) वेट अँड वाॅच करत अाहे.

जडेजा फिट; पड्डिकलला काेराेना
चेन्नई सुपरकिंग्जचा अाॅलराउंडर रवींद्र जडेजा फिट झाला. त्याचा सलामी सामना खेळण्याचा मार्ग सुकर झाला. कोहलीच्या बंंगळुरू टीमचा युवा स्फाेटक सलामीवीर फलंदाज देवदत्त पड्डिकल काेेराेना पॉझिटिव्ह असल्याचे समाेर अाले.

मुंबईमध्ये एकूण १० सामने; वीकेंंडला हाेणारे ४ सामने संकटात
महाराष्ट्रातील मुंंबईच्या वानखेडे स्टेडियवर अायपीएलचे सामने १० अायाेजित करण्यात अाले. यातील वीकेंडला शनिवार, रविवारी एकूण चार सामने हाेतील. यामध्ये शनिवार, १० एप्रिल (चेन्नई-दिल्ली), रविवार, १८ एप्रिल (दिल्ली-पंजाब), शनिवार, २४ एप्रिल (राजस्थान-काेलकाता), रविवार, २५ एप्रिल (चेन्नई-बंगळुरू) याचा समावेश अाहे.

क्रीडा संकुले राहणार बंद; आयपीएलबाबत निर्णय आज?
काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये लाॅकडाऊनबाबत निर्णय घेण्यात अाला. यामध्ये क्रीडा संकुले लाॅक ठेवण्याची घाेषणा करण्यात अाली. मात्र, यादरम्यान महाराष्ट्रात हाेणाऱ्या अायपीएलच्या सामन्यांबाबत काेणताही निर्णय झाला नाही. मात्र, यावर अाज साेमवारी चर्चा हाेण्याची शक्यता अाहे.

बातम्या आणखी आहेत...