आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या महामारी संकटाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. याची झळ बीसीसीआयलाही बसली. याच संंकटामुळे गत वर्षीच्या आयपीएल-१३ चे आयोजन देशाबाहेर करण्यात आले होते. त्याचा मोठा परिणाम बाजारमूल्यावर झाला. यामुळे लीगच्या मूल्यात २२% घसरण झाली. ब्रिटनची व्यवसायाचे आर्थिक विश्लेषण करणारी कंपनी ब्रँड फायनान्सने आयपीएल २०२० चा वार्षिक अहवाल जाहीर केला. त्यानुसार २०१९ मध्ये आयपीएलचे बाजारमूल्य ४७ हजार कोटी रुपये होते. आता कमी होत ३२ हजार १५० कोटी रुपये झाले. मात्र, जैवसुरक्षित वातावरण आणि रिकामे स्टेडियम असतानाही मुंबई इंडियन्सच्या बाजारमूल्यात वाढ झाली आहे. या संघाचे मूल्य ७.१% वाढले. धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला माेठा फटका बसला. टीमच्या मूल्यात सर्वाधिक घसरण झाली.
काेलकाता संघ पाचव्या स्थानावर; मुंबई इंडियन्सचा दबदबा कायम
पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ हा लीगमधील सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. त्यांचा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स १०० पैकी ७६.९ आहे. गतसत्रात कोलकाता नाइट रायडर्स संघ सर्वात मजबूत ब्रँड होता. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स (७०.५) दुसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद (६७) तिसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (६६.१) चौथ्या, चेन्नई सुपरकिंग्ज (६२.४) पाचव्या, कोलकाता नाइट रायडर्स (६१.३) सहाव्या, किंग्ज इलेव्हन पंजाब (६१.२) सातव्या आणि राजस्थान राॅयल्स (५७.१) आठव्या स्थानी आहे.
ग्रोथ : २००९ नंतर राजस्थान राॅयल्सच्या मूल्यात प्रचंड घसरण; मुंबई इंडियन्सने कायम ठेवले अव्वल स्थान, हैदराबाद संघाने गाठले हाेते दुसरे स्थान.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.