आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्याला मिळाले नवीन पोलिस महासंचालक:1987 बॅचचे IPS अधिकारी हेमंत नगराळे महाराष्ट्राचे नवीन पोलिस महासंचालक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आहेत प्रसिद्ध

1987 बॅचचे IPS अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआएसएपच्या महासंचालक पदी निवड झाल्यामुळे राज्याचे महासंचालक पद रिक्त होते. गुरुवारी राज्यातील महाविकास अघाडी सरकारने नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

नगराळे आता लीगल आणि टेक्निकल विभागाचे पोलिस महासंचालक आहेत

हेमंत नगराळे यापुढे 19 महीने महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहू शकतात. नगराळे यांनी 2016 नवी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. यानंतर 2018 मध्ये त्यांचे नागपूरमध्ये ट्रांसफर झाले होते. सध्या ते लीगल अँड टेक्निकल विभागाचे पोलिस महासंचालक आहेत.

यामुळे चर्चेत राहिले हेमंत नगराळे

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी असताना 2017 मध्ये वाशीच्या बँक ऑफ बड़ौदामध्ये झालेल्या चोरीचा उलगडा फक्त दोन दिवसात केला होता.

पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या प्रोग्रामदरम्यान कायदा व सूव्यवस्था राखल्यामुळे सन्मानित करण्यात आले होते.

ड्यूटीवर हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक अॅक्शन घेण्यासाठी ते ओळखले जातात.

विधान परिषदेची मंजुरी घेतल्याशिवाय शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला होता, यामुळे 2018 मध्ये त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...