आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई अन् सुटका:आयपीएस परमबीरसिंग सुटले, आयआरएस वानखेडे अडकले, भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे होते आरोप

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंभर कोटींच्या हप्तेखोरीचा आरोप करून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना तुरुंगात पाठवणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त व निवृत्त आयपीएस परमबीरसिंग यांचे निलंबन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मागे घेतले. त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतरच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अटकेच्या भीतीने ते फरार होते. तसेच त्यांची होमगार्ड दलाचे प्रमुख म्हणून बदली केली होती. त्यामुळे डिसेंबर २०२१ मध्ये ठाकरे सरकारने त्यांना निलंबित केलेे. दरम्यान, ‘कॅट’ने सिंग यांच्यावरील आरोप चुकीचे ठरवून त्यांचे निलंबन रद्द केले होते.
नवाब मलिकांचा रोष, भाजप प्रवेशाचीही चर्चा
ड्रग्जप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला वानखेडेंनी अटक केली होती. तेव्हा वानखेडे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप मलिकांनी केला. वानखेडेंच्या भाजप प्रवेशाची चर्चाही झाली.
मंत्र्यांवर गंभीर आराेप केले पण पुरावे देण्यास असमर्थ गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपाचे पुरावे कोर्टात देण्यास सिंग असमर्थ ठरले होते. त्यामुळे ते भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप मविआचे नेते करत होते.
------​​​​

शाहरुखच्या मुलाकडून २५ कोटी रु. लाचेच्या आरोपानंतर सीबीआय छापे

प्रतिनिधी | मुंबई
अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यनसह २० जणांना २ ऑक्टोबर २०२१ रोजी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत अटक करणारे आयआरएस अधिकारी, ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे सीबीआयच्या रडारवर आले आहेत. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागून ५० लाखांचा हप्ता घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या खंडणी प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी मुंबई, दिल्ली, कानपूर, रांचीसह २९ ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम राबवली. त्यात नेमके काय जप्त करण्यात आले हे पथकाने जाहीर केलेले नाही.

अंगरक्षकाचा गौप्यस्फोट
क्रुझवरील ड्रग्ज कारवाईतील मुख्य पंच किरण गोसावी यांचा अंगरक्षक प्रभाकर सायल यांनी वानखेडेंनी २५ कोटींची डील केल्याचा गौप्यस्फोट केला होता.

‘ते’ ७ महिनेही सेवा काळ
कॅटच्या निर्णयाच्या आधारे निलंबन मागे घेतल्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. २ डिसेंबर २०२१ ते ३० जून २०२२ (निवृत्तीपर्यंत) हा निलंबन काळ आता सिंग यांचा सेवा काळ म्हणून ग्राह्य धरला जाईल.
गृहमंत्र्यांवर १०० कोटी हप्त्याचे आरोप केल्यानंतर झालेले निलंबन अखेर मागे