आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पालिका आयुक्तांची कोलांटउडी:12 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कॅगच्या चौकशीला आक्षेप, नोटीसही पाठवली

विनोद यादव । मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आता रंजक वळण आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यापूर्वी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकच्या (कॅग) विशेष लेखापरीक्षण पथकाला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता अचानक त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. कॅगच्या लेखापरीक्षण तपासणीवर आक्षेप व्यक्त करत त्यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात घेतलेल्या निर्णयांची तपासणी कॅग करू शकत नाही. कारण, त्यांच्या लेखापरीक्षकाला कोरोना काळात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचा अनुभव नाही.

मुंबई पालिकेची कॅगला नोटीस

इक्बाल सिंह चहल यांच्या सूचनेवरून मुंबई महापालिकेच्या विधी विभागाने कॅगला नोटीसही पाठवली आहे. मुंबई महानगरपालिकेने कॅगला नोटीस पाठवून सांगितले आहे की, साथी रोग प्रतिबंधक कायदा, 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 लागू असताना झालेल्या खर्चाचे ऑडिट कॅग करू शकत नाही. कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार पालिका अधिकाऱ्यांना आहेत. याशिवाय, जेव्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू होतो तेव्हा कॅग आणि सीआरपीसीसह सर्व कायद्यांचा प्रभाव कमी होतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चौकशीचे आदेश

महत्वाचे म्हणजे, कॅग टीमला डिसेंबर महिन्यापर्यंत तपास पूर्ण करायचा आहे. या कामात महापालिका आयुक्त चहल यांनीही आपल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र आता एकप्रकारे ते तपासात अडथळे निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई महापालिकेने २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेतलेल्या निर्णयांची कॅग चौकशी करण्याचे आदेश दिले.

कॅगचे पथक या प्रकरणांची करत आहे चौकशी

  • कोरोना काळात झालेल्या 3,538 कोटींची मध्यवर्ती खरेदी
  • अजमेरा विकासकाकडून महानगरपालिकेने 339 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलेला भूखंड
  • चार पुलांच्या बांधकामावर झालेला १,४९६ कोटी रुपयांचा खर्च
  • कोरोना काळात 904 कोटी रुपयांची खरेदी
बातम्या आणखी आहेत...