आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीर वानखेडेंची हेरगिरी केली जात आहे का?:2 पोलिस माझा पाठलाग करत आहेत, फोनही टॅप केला जातोय, NCB च्या अधिकाऱ्याचे DGP ला पत्र

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वानखेडे यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणे आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रारही केली आहे. मात्र, याला वानखेडे यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. वानखेडे यांनी पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही सादर केले आहे. मुंबई एनसीबी टीमच्या इतर अधिकाऱ्यांनाही 'ट्रॅक' केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलिसांचे एक पथक स्मशानभूमीत गेले आहे आणि तेथून एक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे 2015 मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून ते जवळजवळ दररोज स्मशानभूमीला भेट देतात. यानंतर त्यांना पाठलाग केला जात असल्याचा संशय आला.

वानखेडे बॉलीवूडमध्ये ड्रग्स अँगलची चौकशी करत आहेत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीची ड्रग चॅट समोर आल्यानंतर हे प्रकरण एनसीबीकडे गेले होते. या प्रकरणानंतर वानखेडे प्रकाशझोतात आले. त्यांनी आतापर्यंत अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्ती, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, भारती सिंह आणि अभिनेता अर्जुन रामपाल यासारख्या हायप्रोफाईल सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. यातील रिया आणि भारती यांना अटक देखील करण्यात आली होती.

गेल्या वर्षी झाला होता हल्ला
गेल्या वर्षी, रिया चक्रवर्ती आणि इतरांना सुशांत सिंहच्या मृत्यूसंदर्भात एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्या काळात एनसीबीने मुंबईत अनेक ड्रग तस्करांना पकडले. वानखेडे यांच्याकडे माहिती होती की एक पॅडलर गोरेगावच्या स्टेशनजवळ LSD ड्रग्जचा पुरवठा करणार आहे. वानखेडे टीमसह तेथे पोहोचले तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. वानखेडे आणि त्यांचे दोन साथीदारही जखमी झाले, पण तोपर्यंत त्यांनी पॅडलर पकडून गाडीतही बसवले होते.

वानखेडे यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या
एअर इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख असताना वानखेडे यांना अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. जेव्हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा वानखेडे यांना सिक्योरिटी देण्याविषयी विचारण्यात आले, परंतु वानखेडे यांनी नकार दिला.

समीर वानखेडे यांना 6 महिन्यांची मुदतवाढ
समीर वानखेडे आणि त्यांची टीम हायप्रोफाईल क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचाही तपास करत आहे. एनसीबी टीमकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 6 महिने आहेत. दरम्यान, NCB मधील समीर वानखेडे यांची मुदत आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली.

कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे, मूळचे महाराष्ट्रातील, 2008 च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उप सीमाशुल्क आयुक्त म्हणून होती. त्याच्या क्षमतेमुळे त्यांना नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आले.

ते अमली पदार्थ आणि ड्रग्स संबंधित बाबींमध्ये तज्ञ मानले जातात. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सुमारे 18 हजार कोटी रुपयांचे मादक आणि ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले. अलीकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून एनसीबीमध्ये बदली झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...