आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपचा महाविकास आघाडीवर निशाणा:हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? आशिष शेलारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधीपक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या कंगनाप्रकरणावरुन भाजपने सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शिवसैनिकांकडून एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. यावरुनही सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा याच विषयावरुन भाजप नेते आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

नुकतेच शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरूनच शेलारांनी सरकारवर हल्लाबोलकेला आहे. हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

'मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?' असे ट्विट करत आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.