आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलचे मराठी प्रेम:इस्रायली दूतावासाने चक्क मराठीत ट्विट करून केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे अभिनंदन, या प्रकल्पाचे केले कौतुक

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायलने पाण्याच्या प्रकल्पावर ट्विट करताना चक्क मराठीत लिहून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. समुद्राचे खारट पाणी गोड करून मुंबईकरांची तहाण भागवली जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पात इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून माहिती जाहीर होताच इस्रायलने मराठीतून ट्विट करत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले.

इस्रायलने दिला महाराष्ट्र सरकारला पाठिंबा!
मुंबईत असलेल्या इस्रायलच्या दूतावासाने ट्विट करून लिहिले, "मा. मुख्यमंत्री पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन." इस्रायलने पुढे लिहिले, "जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सोमवारी खारे पाणी गोड करण्याच्या योजनेचा करार करण्यात आला. मुंबई महानगरपालिका आणि इस्रायलच्या IDETechnologies यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात झाला आहे. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न आता समुद्राच्या पाण्यातून सोडवला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी सुद्धा बीएमसीकडे हा प्रस्ताव आला होता. परंतु, तांत्रिक कारणे दाखवून हा प्रकल्प थंड बसण्यात टाकण्यात आला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने नव्याने यासाठी प्रयत्न सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...