आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीत मंदी?:कंपन्यांनी रद्द केले हजारो उमेदवारांचे ऑफर लेटर, मंदीचे कारण केले जातेय पुढे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांनी फ्रेशर्सना दिलेले ऑफर लेटर रद्द केले आहेत. यापूर्वी त्यांच्या रुजू होण्याच्या तारखा तीन ते चार महिन्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता हजारो ऑफर लेटर रद्द करण्यात आली. यासाठी निवड प्रक्रियेत उमेदवारांना मुलाखतीच्या अनेक फेऱ्यांतून जावे लागले.

मात्र, कंपनीने ठरवून दिलेल्या शैक्षणिक मानकांची पूर्तता होत नसल्याचे मुलांना ई-मेलद्वारे कंपन्यांकडून कळवण्यात आले. त्यामुळे त्यांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. तथापि, उमदेवार दावा करतात की यापूर्वी ते या सर्व पॅरामीटर्स अंतर्गत पात्र ठरले होते.

इंदूरच्या पवित्रा (नाव बदलले आहे) यांना ६ महिन्यांपूर्वी ऑफर लेटर देण्यात आले होते. २८ सप्टेंबर रोजी इन्फोसिसने तिला मेल करून सांगितले की, ती कंपनीची शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नाही. तथापि, विप्रोने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ते पात्र उमेदवारांना दिलेली ऑफर पत्रे परत घेणार नाहीत. कंपनी लवकरच अशा उमेदवारांची नियुक्तीही करेल. अन्य दोन कंपन्यांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. आयटी क्षेत्रातील नोकरीची वाढ १०% वर पोहोचली. भारतात काम करणाऱ्या जागतिक आयटी कंपनीचे एचआर मॅनेजर अमित सिंग यांनी सांगितले की, मंदीची भीती हे ऑफर लेटर मागे घेण्याचे एक मोठे कारण असू शकते. अलीकडच्या तिमाहीत भारतीय आयटी उद्योगाची वाढ मंदावली आहे. नोकरी डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये नवीन भरतीमध्ये आयटी क्षेत्रात केवळ १०% वाढ झाल्याचे हेच कारण आहे.

बातम्या आणखी आहेत...