आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • It Has Been Decided That Regular Time tabled Passenger Services Including Mail Express, Passenger And Suburban Services Stand Cancelled Up To 12 August Railway Board

मुंबई लाइफलाइन:लोकल सुरू होण्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा, लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस ट्रेनही रद्द, रेल्वे मंत्रालयाचा निर्णय 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा

मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुंबईकरांना 12 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणखी दीड महिना बंदच असणार आहे. 12 ऑगस्टपर्यंत देशभरातील लोकल, मेट्रो, लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि ईएमयू ट्रेनची वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. 

देशभरात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. मुंबईमध्ये तर कोरोनाने कहर केला आहे. अशात लोकल सुरू करणे धोक्याचे ठरु शकते. यामुळेच रेल्वे बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष लोकल या सुरू राहणार आहे. मात्र इतर उपनगरी लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. जून अखेरपर्यंत केलेल्या आगाऊ तिकीट आरक्षणाचे संपूर्ण रिफंड देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला होता. आता हा कालावधी एक जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत  वाढवला आहे. त्यानुसार ट्रेनचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकीटाचे 100 टक्के रिफंड दिले जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा
लोकलसेवा ही सर्वसामान्यांसाठी बंद असली तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकस सुरू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी अद्याप लोकलने प्रवास करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...