आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणांतून पाणी:मराठवाड्याला कोकणातील अतिरिक्त पाणी मिळणार हे कृषीसाठी महत्त्वाचे

डॉ भगवानराव कापसे, उपाध्यक्ष, महाकेसर आंबा बागायतदार संघ; गटशेती प्रणेते, छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे पाणी पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना देण्याविषयी उल्लेखच नाही

यंदा अर्थसंकल्पात शेतीला आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अतिशय सिंहाचा वाटा ठेवला आहे. कोकणातील वैतरणा, मुकणी, पिंजाळ, दमणगंगा अशा नद्यांमधून शिल्लक पाणी सरळ समुद्रात वाहून जात होते. हे ६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची मराठवाड्यातील शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी यंदा पूर्ण होत आहे. आता गोदावरी खोऱ्यामध्ये गोदावरीचे १०२ टीएमसी पाणी, कोकणातून आलेले ६७ टीएमसी पाणी असे एकूण १६९ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. वाॅटरग्रीड योजनेला पुनरुज्जीवन मिळाले. जायकवाडीच्या बॅक वॉटरमधून वेगवेगळे लिफ्ट उभारून जवळच्या भागांत पाणी उपलब्ध करून देणे ही बाबसुद्धा शेती विकासासाठी फायद्याची आहे. धरणातील पाणी शेतकऱ्यांना पाइपलाइनद्वारे पुरवठा करणे आवश्यक होते. त्याविषयी अर्थसंकल्पात उल्लेख नाही.

उजनीतून धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी, भूम, परंडा, वाशी, धाराशिवपर्यंत तसेच उमरगा, तुळजापूर, आष्टी अशा विविध ठिकाणी २३ टीएमसी पाणी आणण्याची योजना महत्त्वाची ठरेल. जायकवाडीतील पाण्यावर सौरऊर्जा निर्माण करण्याचे व्यवस्थापन हीसुद्धा एक प्रभावी योजना आहे. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा प्रभावीपणे सुरू करणे महत्त्वाचे ठरते. धरणातील गाळ काढणे गाळयुक्त शिवारसाठीची तरतूद फायद्याची आहे. शेततळी, कृषिपंपांना वीज, सोलार योजना फायद्याची ठरणार आहे.

उत्साहवर्धक तरतुदी : सेंद्रिय शेतीसाठी अतिशय भरघोस अशी तरतूद, शेतकऱ्यांना तीन हजार कोटींची कर्जमाफी, नुकसान भरपाईसाठी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी तसेच शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासन भरेल या गोष्टीही उत्साहवर्धक आहेत. राज्यात पांडुरंग फुंडकर फळबाग योजना तसेच रोजगार हमी योजनेतून फळबाग योजनेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...