आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकार ठाम:सध्याच्या परिस्थितीत अंतिम वर्षाची परीक्षा घेणे अशक्य, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंत यांची माहिती

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निर्णयाबाबत राज्य सरकार ठाम

अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक झाली. या बैठकीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, "यूसीजीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार परीक्षा घेता येईल का याबाबत विचार करण्यात आला. मात्र आजची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता परीक्षा घेणे अशक्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर करण्यात आले आहेत. परीक्षा घेणे म्हणजे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे. मागच्या परिस्थिती पेक्षा आताची कोविड संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे.

यूसीची विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या जबाबदारी घेणार का?

बंगळुरूत 50 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील निम्म्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे यूसीजी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का असा सवालही सामंत यांनी यावेळी केला.

  

काय म्हणाले उदय सामंत?

> एटीकेटी बाबत सर्व कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला.

> बंगळुरूमध्ये 50 जणांची परीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाली.

> मग यूसीची हजारो विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार का?

> वाईन शॉप आणि विद्यार्थी यांची तुलना करू नका.

> पालक आणि विद्यार्थ्यांचा या परीक्षेला विरोध.

> सरकारला कुठला इगो नाही.

> 12 हजार कंटेन्मेंट झोन, या मध्ये 1 कोटी लोक आहेत, मग येथील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार?

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser