आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • It Is Natural That There Is Truth In Ashok Chavan's Secret Explosion, Jayant Patil Said That Efforts Have Been Made To Reduce The Importance Of Pankaja Munde For The Past Few Years.

अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटात तथ्य स्वाभाविक:जयंत पाटील, म्हणाले- गत काही वर्षांपासून पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2014 साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे. असे मत व्यक्त करतानाच पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न गत काही वर्षांपासून होत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निरीक्षण नोंदवले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

भाजप पंकजांना महत्व देत नाही

जयंत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे यांना भाजप म्हणावे तितके महत्त्व देत नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पंकजा मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे.

मराठा समाजाबद्दल सीएमचीही तीच भुमिका
जयंत पाटील म्हणाले, मराठा तरुणांबद्दल आणि समाजाबद्दल मंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केले ते अत्यंत धक्कादायक आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे फक्त ते मांडत नाहीत तानाजी सावंत ते मांडत आहेत.

तानाजी सावंतांना टोला

जयंत पाटलांनी तानाजी सावंतांना खोचक टोला लगावला की, आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना कमी बोलण्यास सांगितले असले तरी माणसाचा स्वभाव जात नाही इथे तर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र झाले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरी माईक समोर आल्यावर मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्याची प्रथा आणि इच्छा बर्‍याच जणांची जागृत होताना दिसते.

गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय

जयंत पाटील म्हणाले, सुरुवातीला मोदीसरकारकडून सर्वांना गॅस सिलेंडर वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले त्यानंतर सर्वांनी सिलेंडर घेतल्यावर सबसिडी कमी करण्यात आली म्हणजे गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय असं वाटायला लागले आहे.

आता सिलेंडर वापरावर बंधन आणणे म्हणजे खुल्या बाजारात जो दर असेल (उदाहरणार्थ दोन - अडीच हजार रुपये ) त्याच दरात जनतेने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे मात्र या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला व मध्यमवर्गीय नागरिकांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

गडकरींनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केलं

जयंत पाटील म्हणाले, नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केले आहे. देशात ज्याच्याकडे भांडवल जास्त आहे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. श्रीमंत लोकांची संख्या मूठभर आहे आणि गरीब लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. आपल्या देशाची संपत्ती ठराविक लोकांच्यामध्ये वाटली गेली आहे. देशातील फार मोठा वर्ग हा संपत्तीपासून लांब राहिला आहे त्यामुळे श्रीमंत आणि गरीब याच्यातील दरी ही मागच्या काळात जेवढी होती ती मागील सात - आठ वर्षांत वाढलेली दिसत आहे. असा निष्कर्ष अनेक अर्थतज्ज्ञांनी काढला आहे, तेच पुन्हा नितीन गडकरी आपल्या भाषणात आणि वक्तव्यातून बोलत आहेत.

बातम्या आणखी आहेत...