आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 आमदारांच्या नियुक्तीची पेच:12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या हे घटनाविरोधी, म्हणून शरद पवारांना मोदींच्या कानावर घालण्याची विनंती केली - जयंत पाटील

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघा़डी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल व सरकार असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या धर्तीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्त्या न होणे हे घटनाविरोधी असल्याचे म्हटले असून या मुद्द्यावर मोदींना लक्ष घालण्याबाबत शरद पवार यांच्याकडे विनंती केली आहे असे सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. ही बाब घटना विरोधी आहे. विधान परिषदेतील जागा रिक्त ठेवणे असे कधीही घडले नाही. त्यामुळे सर्वोच्च ठिकाणी पंतप्रधानांच्या कानावर हे घालायला हवे असे आम्हाला वाटते.

त्यामुळेच आमचे नेते शरद पवार यांना विनंती केली होती की, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील आमदारांच्या नियुक्त्या तात्काळ करायला हव्या यासाठी ही बाब त्यांच्या कानावर घालावी, वरिष्ठ स्तरावर दाद मागितली तर ती मागणी पुर्ण होईल अशी आशा असल्याने आम्ही शरद पवार यांना याबाबत विनंती केली होती, त्या धर्तीवरही ही भेट घेतली आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

संघर्षानंतरही पेच कायम

12 आमदारांच्या नियुक्त्यांसाठी सरकारतर्फे सर्व पुर्तता केली गेली, राज्यपालांनी हा मुद्दा प्राधान्याने हाती घ्यावा अशी विनंतीही केली गेली पण सरकारने विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांचे निलंबन केले होते त्यानंतर 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला गेला. हा पेच अजूनही कायम असून यात पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून झाली आहे त्यामुळे हा कायम असलेला पेच आता तरी सुटेल अशी शक्यता असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...