आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंवर टीकास्त्र:शिर्डी-त्र्यंबकेश्वरमध्ये आरती न होणे दुर्दैवी, खा. संजय राऊत यांची खरमरीत टीका

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदूंसाठी आजचा काळा दिवस आहे. आज शिर्डी, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, नगरचे शनी शिंगणापूर येथे काकड आरती झाली नाही. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

हजारो मशिदीत आज अजान झालीच नाही, असे राज ठाकरे म्हणाले. नियम सगळ्यांसाठी सारखा आहे आणि याचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मीयांना बसला आहे. भाजपने मनसेला पुढे करत याप्रकरणी राज्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरांवर आज भोंगे न लागल्याने लाखो हिंदू बांधवांची गैरसोय झाली. नवहिंदुत्ववाद्यांमुळे हिंदू धर्मातील सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करावे लागले. मशिदीवरील भोंग्याचे निमित्त करून मंदिरावरील भोंगे उतरवण्याचे काम भाजप आणि त्यांचे उपवस्त्र असलेल्या मनसेने केल्याचा आरोप सेना नेते संजय राऊतांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...