आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय:राणा दांपत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली होती, पण म्हणून त्यांच्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे पूर्णपणे चुकीचे होते, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याना जामीन देताना आपल्या आदेशात नोंदवले आहे. गुरुवारी या दोघांना जामीन मिळाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान राणा दांपत्याने दिले होते. यानंतर दोघांवरही गंभीर आरोप ठेवत पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

काय म्हणाले न्यायालय?
“राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांबाबत वापरलेले शब्द अयोग्य आहेत. हे स्पष्ट आहे की, राणा दांपत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली. परंतु फक्त अयोग्य शब्दांचा वापर राजद्रोहाचे कलम १२४ (अ) लावण्याकरता पुरेसा नाही. एखाद्या वक्तव्यामुळे समाजात अशांतता पसरण्याची शक्यता आहे. अशा वेळी या कलमाचा वापर होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...