आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:हिंदुत्वाची झेप घेणाऱ्या राज ठाकरेंचा भाजपनेच टप्प्यात कार्यक्रम केला

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या खांद्यावर बसून हिंदुत्वाची झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरेंना भाजपच्याच उत्तर प्रदेशातील खासदाराने अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला. भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. पहिल्यांदा हिंदी भाषिकांची माफी मागा तरच अयोध्येत या, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे शेवटी कर्माची फळे प्रत्येकाला तिथेच भोगावी लागतात, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा पतंग उडण्याअगोदरच भाजपकडून कन्नीकट करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी जे कल्याण रेल्वेस्थानकावर उत्तर भारतीय विद्यार्थ्यांसोबत आणि मुंबईतील टॅक्सीचालकांबाबत केले त्याची फळे आज त्यांना अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने भोगावी लागत आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असेही तपासे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...