आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावं ते नवलच:मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात सापडले 130 वर्षे जुने भुयार; डॉक्टरांना पायी चक्कर मारताना लागला शोध

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा जे. जे. रुग्णालयात तब्बल 130 वर्षे जुने भुयार सापडले आहे. या भुयाराची लांबी तब्बल 200 मीटर असल्याचे समजते.

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर अरुण राठोड पायी जात होते. तेव्हा त्यांना एक झाकण दिसले. ते उघडले असता आत भुयार असल्याचे समोर आले.

कुठपासून कुठपर्यंत?

जे. जे. रुग्णालयात सापडलेले भुयार डिलिव्हरी वॉर्डपासून ते थेट चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. ऑर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि स्थानिक प्रशासनाला या भुयाराची माहिती कळवण्यात येणार आहे. हे भुयार डी. एम. पेटीट आणि मोटली बाई या इमारतींना जोडते.

अतिशय प्रसिद्ध रुग्णालय

मुंबईतले सर जे. जे. रुग्णालय म्हणजेच सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय. या रुग्णालयाची इमारत 177 वर्षांपू्र्वी बांधली गेली. त्यासाठी जमशेदजी जिजीभॉ यांनी एक लाखाची देणगी दिली. 15 मे 1845 रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले.

पूर्वी राजभवनातही सापडले

मुंबईतल्या राजभवनातही 2016 मध्ये एक ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. हे भुयारही सर्वाशेवर्षे जुने आहे. ते 15000 चौरस फूट आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी यांनी भुयाराच्या पूर्वेस असलेल्या प्रवेशद्वाराची भिंत तोडण्याचे आदेश दिले. तेव्हा भुयारात 20 फूट उंचीच्या एकूण 13 रूम सापडल्या.

बातम्या आणखी आहेत...