आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीन फेटाळला:जयसिंघानी पिता-पुत्रीने 10 कोटी उकळण्याचा केला प्रयत्न, विशेष न्यायालयाची टिप्पणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुकी अनिल जयसिंघानीविरोधातील विविध गुन्ह्यातून सोडवण्यासाठी स्पष्ट नकार दिल्यानंतर जयसिंघानी आणि त्याची कन्या अनिक्षा या दोघांनी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा आणि त्यानंतर खासगी मेसेजचा वापर करुन १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याची टिप्पण्णी विशेष न्यायालयाने केली

लाचलुचपत प्रकरणाचे विशेष न्यायाधीश दीपक आलमले यांनी १ एप्रिल रोजी अनिल जयसिंघानीचा जामीन फेटाळला. त्याची कारणे स्पष्ट करणारा न्यायालयाचा विस्तृत आदेश मंगळवारी जारी झाला. अमृता यांचे पती देवेंद्र फडणवीस हे उचपदस्थ असल्याने आपल्या वडिलांना विविध गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी अनिक्षाने आधी अमृता यांच्याशी मैत्री केली. त्यांना १ कोटी रुपयांची लाच देऊ करण्याचा प्रयत्न केला. अमृता यांनी त्यास नकार दिल्यानंतर अमृता यांच्या मोबाइलवर पाठवलेले व्हिडीअो,व्हाॅइस नोट्स आणि स्क्रीन शाॅटस् चा गैरउपयोग करुन त्यांच्याकडून अनिक्षाने १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केला असे आदेशात म्हटले आहे.