आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या हमालाने केली कमाल:युट्युब पाहून घरीच तयार केल्या नकली नोटा; जवळपास पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई / जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावच्या हमालाने कमाल केली आहे. युट्युबवर व्हिडिओ पाहून त्याने आपल्या राहत्या घरीच नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रातोरात श्रीमंत होण्याच्या हव्यासाने त्याने घरातच नकली नोटाचा कारखाना थाटला होता. नोटा चालविण्यासाठी केवळ 50 हजारांमध्ये दीड लाखांच्या नोटा देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून जवळपास 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमके प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यात गेली काही दिवस बनावट नोटांचा चलनात मोठा प्रमाणात वापर होताना दिसून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी कारवाई करत काही खोट्या नोट्या जप्त केल्या होत्या. यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती घरातच खोट्या नोटा छापून विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी सापळा रचला आणि खोट्या नोटा तयार करणाऱ्या कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव (वय 31) याला बोलाविले. आढाव याच्यासोबत 50 हजारांमध्ये दीड लाखांच्या नोटा देण्याचा सौदा पोलिसांनी फिक्स केला. मात्र, अचानक त्याला 3 लाखांच्या नोटाची मागणी केली, तेव्हा त्याला या गोष्टीचा संशय आल्याने त्याने पोलिसांना चकवा देत त्या ठिकाणरहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला गाठत अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून 100, 200, 500 रुपयाच्या 1 लाख 68 हजार रुपयांच्या खोट्या नोटांसह घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासातून हमाली करणाऱ्या देविदास पुंडलिक आढाव याने युट्युबवर नोटा छापण्याचे पाहून या नकली नोटा छापल्या आहे, असे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...