आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक:आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, अशीच प्रगती कर; त्यांनीच मला घडवले, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी - नारायण राणे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ येथे दाखल झाले. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यासोबतच त्यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला.

नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी त्यांना एवढेच सांगितले की, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला असायला हवे होतात. मला बाळासाहेबांनीच घडवलेले आहे, दिलेले आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असेच यश मिळव आणि प्रगती कर माझा आशीर्वाद आहेत. असे म्हणत त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता. आज त्यांचा हात नसला तरी आशीर्वाद माझ्यासोबत आहेत' असे राणे म्हणाले.

पापाचा घडा फुटणार
नारायण राणे यांनी बोलताना मुंबई महापालिका निवडणुकांवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचेच सरकार येईल. मुंबई महापालिका जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. ही महापालिका काही झाले तरी आम्ही जिंकणारच, असा निर्धार राणेंनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...