आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा सभा वर्षपूर्ती:'जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली' शरद पवारांच्या भरपावसातील सभेची वर्षपूर्ती ; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ असं म्हणत वर्षपूर्तीनिमित्त भाजपला पुन्हा खोचक टोला लगावला आहे.

गेल्या वर्षी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते एकामागून एक भाजपमध्ये प्रवेश करत होते. आता राष्ट्रवादी संपणार की, काय असे अंदाज राजकीय पक्षांकडून वर्तवण्यात येत होते. याच वेळी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या 'न भूतो न भविष्यति' अशा या सभेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटवर अकाउंटवरुन भाजपला टोला लगावण्यात आला आहे. भर पावसात न थकता पवारांनी सभा घेतली होती. यावरुन आता ‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ असं म्हणत वर्षपूर्तीनिमित्त भाजपला पुन्हा खोचक टोला लगावला आहे. ‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण 18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ असे म्हणत राष्ट्रवादींने साताऱ्यातील भाषणाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

साताऱ्यात 18 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांचं भाषण आयोजित करण्यात आले होते. मंचावर पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर निशाणा साधत होते आणि अचानक पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. शरद पवार यांनी वयाच्या 79 व्या वर्षी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली. सभेदरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नेत्यांनी आपल्या सभा रद्द केल्या होत्या. मात्र पवारांनी या वयात दाखवलेल्या जिद्दीने राजकीय वातावरणच पालटले. सोशल मीडियावर शरद पवारांच्या तरूणांना लाजवेल अशा या स्वभावाचं सगळीकडूनच जोरदार कौतुक झाले. याचा परिणाम म्हणून उदयनराजेंना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. याचा विधानभा निवडणुकांवरही परिणाम झाला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser