आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीची 2 हजार कोटी गुंतवणूक अपेक्षित:जपानमधील ‘सुमिटोमो’ कंपनीला महाराष्ट्रामध्ये जागा देणार : सामंत

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमधील सुमिटोमो कंपनी महाराष्ट्रामध्ये २ हजार ६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्या कंपनीला जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच देशातील पहिल्या हायड्रोजन धोरणाला प्रतिसाद देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत विविध विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत झालेल्या निर्णयांबाबत उद्योगमंत्री सामंत यांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर उद्योग जाण्यावरून वातावरण तापले आहे. विरोधकांनी सामंत यांनाही लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी ही माहिती दिली. यापूर्वी जपानच्या सुमिटोमो कंपनीने ५ ते ६ वेळा मागील शासनाच्या काळात दोन हजार ११ कोटींच्या गुंतवणुकीसाठी उद्योगाला जागा मागितली होती. पण मागील अडीच वर्षात एक इंचही जागा या कंपनीला देण्यात आली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...