आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमधील सुमिटोमो कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुक करणार:3 हजार लोकांना थेट नोकरीची संधी, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमधील सुमिटोमो कंपनी महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी 2 हजार 667 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्या कंपनीला जागा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून 3 हजार लोकांना थेट नोकरीची संधी मिळेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर उद्योग जाण्यावरून वातावरण बिघडले आहे. ही कंपनी गेली, ती कंपनी गेली. पण आता त्यांची तोंडे बंद करण्याची वेळ आली आहे. जपानच्या सुमिटोमो कंपनीने 5 ते 6 वेळा मागील शासनाच्या काळात 2,011 कोटींच्या गुंतवणुकीसाठी उद्योगाला जागा मागितली होती. पण मागील अडीच वर्षात एक इंचही जागा या कंपनीला देण्यात आली नव्हती. यापुर्वी या कंपनीच्या निविदा का रद्द झाल्या, असा सवाल करत त्यांनी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

राज्यात हायड्रोजनवर चालणारा वाहननिर्मितीचा प्रकल्प

उदय सामंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रोजन पॉलिसीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कुटर तसेच बोटीनिर्मिती करणारा परदेशी प्रकल्प राज्यात येणार आहे. याबाबतचा करार करण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

प्रत्यारोपाच्या फैरी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातून जाणाऱ्या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. हे सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...