आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदारावर अटकेची टांगती तलवार:जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याचा आरोप

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळावी म्हणून प्रयत्नशिल असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा जामीन अर्ज वडूज येथील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

जयकुमार गोरे माण - खटावचे आमदार आहेत. त्यांच्या इतर सहकाऱ्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे.

यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. तत्पुर्वी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला. फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील मिलिंद ओक यांनी बाजू मांडली.

वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्ज केला होता. त्यावर वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून हा निर्णय दिला.

बातम्या आणखी आहेत...