आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:जयंत पाटील-अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर; पार्थप्रकरणी शरद पवारांशी चर्चा झाली नाही : जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पार्थ यांना स्पष्टीकरण मागण्याचा प्रश्नच नाही - जयंत पाटील

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचा कठोर शब्दांत समाचार घेतल्यानंतर पार्थ यांचे वडील अजित पवार यांनी बुधवारी सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. बैठकीनंतर पाटील म्हणाले की, “बैठक पूर्वनियोजित होती. पार्थ यांच्याबद्दल चर्चा झाली नाही. पवार कुटुंब व राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही. शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. वडिलकीच्या नात्याने सल्ला, सूचना वा आदेश देण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्या नात्यानेच ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात.’ पार्थ यांना स्पष्टीकरण मागण्याचा प्रश्नच नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...