आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हानाचे धनुष्य छातीवर:आमदार संतोष बांगर शब्दांचे पक्के, मिशा काढल्या तर त्यांचा सत्कार करणार; जयंत पाटील यांची टोलेबाजी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील बाजार समितींच्या निवडणुकीवेळी आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन त्यांच्या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून न आल्यास मिशी ठेवणार नाही, असे चॅलेंज दिले होते. मात्र, त्यांच्या 5 जागा आल्यानंतर आता जयंत पाटील यांनी त्यांना चॅलेंजची आठवण करून दिली. ''संतोष बांगर शब्दाचे पक्के, त्यांनी मिशा काढल्या तर सत्कार करू'' असे म्हणत त्यांनी जोरदार टोलाही लगावला.

हे दिले होते चॅलेंज

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे मतमोजणीनंतर निकाल हाती आले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार संतोष बांगल यांनी चॅलेंज दिले होते. "या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असे आमदार संतोष बांगर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती.

मविआचा दणदणीत विजय

हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीचांही निकाल काल समोर आला आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेला कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर बांगर यांच्या विधानाची जयंत पाटील यांनी आठवण करुन दिली.

जयंत पाटील यांचा जोरदार टोला

आमदार जयंत पाटील म्हणाले, संतोष बांगर यांनी मिशी काढली का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले शब्दाचे पक्के असतात. त्यामुळे ते मिशी काढतील. मिशी काढली तर बांगर यांचा आपण सत्कार करु, असा टोला जयंत पाटील यांनी बांगर यांना लगावला.

आमदार बांगर यांच्या पॅनलचा पराभव

कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात भाजप आणि शिवसेनेला ५ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने १२ जागांवर विजय मिळवला.आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. या निकालावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.