आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार-मोदी भेट:सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये चर्चा - जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती पवारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्क विर्तक लावले जात होते. या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामुळे या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नव्हता.

परंतु, या भेटीची पुर्व कल्पना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यासोबतच शरद पवारांनी पंतप्रधानांची नेमकी कशासाठी भेट घेतली याचंदेखील स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.

सरकार क्षेत्राशी संबंधित पवार-मोदी भेट
सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. कारण गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून देशातल्या वेगवेगळ्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी केंद्र सरकारला पत्र पाठवली होती. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये विशेष लक्ष घालत रिझर्व्ह बँकेला तशा सुचना दिल्या जाव्यात. त्याचबरोबर देशातील सुरक्षेचा मुद्दा आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

दोन वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती पवारांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यापूर्वी दिल्लीत केंद्राच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांनीदेखील गेल्या दोन दिवसांत शरद पवारांची भेट घेतली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...