आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळाला धोका नाही:कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या निवडणूकांमध्ये आमची कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रीया उमटत आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या वर्षात याबाबत सुनावणी झाली. परंतू, आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात.

येत्या निवडणूकांमध्ये काही राज्यांमधील आमची कामगिरी समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.

घड्याळाला धोका नाही

जयंत पाटील पुढे म्हणाले, आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असे वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह कायम राहील. याबाबत माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रापुरता हा विषय बघितला तर चिन्हाला कोणताही धक्का लागत नाही असे दिसते.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था , विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.असेही ते म्हणाले. अन्य निवडणुका झाल्यावर आमची परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.