आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक दे इंडिया:जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाले - तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात...

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. दरम्यान, भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला 5-4 ने धूळ चारली आहे. भारताने तब्बल 41 वर्षांनतर हॉकीमध्ये पदक जिंकले आहे. शेवटचे पदक भारतीय संघाने 1980 मध्ये वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वात जिंकले होते. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ नाराशाचा हाती आली होती. भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण भारतातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?
भारतीय संघाने 41 वर्षांनंतर पदक जिंकल्यामुळे जयंत पाटील यांनी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. भारतीय संघाला आज 41 वर्षांनंतर कांस्यपदक मिळवता आले. हॉकी संघाने मिळवलेले हे यश भारतीयांचे उर भरुन आणणार आहे असं पाटील म्हणाले.

41 वर्षांनंतर संपली प्रतिक्षा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने मास्को येथे 1980 मध्ये पदक जिंकले होते. त्यांनतर संघाच्या पदरी सतत निराशाच येत गेली. परंतु भारतीय पुरष हॉकी संघाने 41 वर्षाचे कर्ज फेडले असल्याचे खेळाडूंच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे. यामुळे संपूर्ण देश आज आंनदात आहे. तर दुसरीकडे खेळाडूंच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक पदक जिकल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा अभिनंदन केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, हा एक एतिहासिक दिवस असून प्रत्येक भारतीयांच्या मनात कायम राहील. भारतीय संघाने देशातील तरुणांना नवी आशा दिली आहे. त्यामुळे भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...