आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी मुलाखत:राष्ट्रवादीला राज्यात सर्वात मोठा पक्ष करण्याचे उद्दिष्ट : जयंत पाटील

सांगली (गणेश जोशी)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचा आज 21 वा वर्धापन दिन, पक्ष बळकट करू : प्रदेशाध्यक्ष
Advertisement
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आणण्याचे उद्दिष्ट ठेवूनच आपले गेल्या वर्षापासून कार्य सुरू आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेला बुधवारी २१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील ‘दिव्य मराठी’शी बोलत होते. पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाल्यानंतर देशात व राज्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने यश प्राप्त केले होते. तसेच तत्कालीन केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्ताधारी घटक पक्ष म्हणून आपला पक्ष नेहमीच जबाबदारी सांभाळत आला आहे. अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यात या काळात पक्षनेतृत्वाला जे यश लाभले ते अभिमानाने व जबाबदारीने राष्ट्रवादीने सांभाळले आहे. पवार यांची दूरदृष्टी, अचूक राजकीय निदान व विकासाचा ध्यास यामुळे राष्ट्रवादीने राजकारणाच्या क्षेत्रात आपली वेगळीच छबी निर्माण केली असून शेतकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पक्षाने आपले स्थान निर्माण केले आहे.

किल्लारीचा भूकंप असो, मराठवाड्यातील दुष्काळ असो, महापुराची परिस्थिती असो, एवढेच नव्हे तर सध्याचा कोकणातील चक्रीवादळाचा तडाखा असेल, कशाचीही पर्वा न करता शरद पवार जाऊन सर्वसामान्यांचे सांत्वन करतात. या वयातही शरद पवार आपला राजकीय दूरदृष्टीपणा दाखवत आहेत. यामुळेच आमच्या पक्षाला चांगले भविष्य असल्याचे ते म्हणाले.

भुजबळ, आरआर यांनी सांभाळली धुरा

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी म्हणजे १९९९ ला छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यानंतर आर.आर. पाटील, अरुण गुजराथी, सुनील तटकरे, मधुकर पिचड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु आपल्यासारख्या एका पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याला राष्ट्रवादीची धुरा शरद पवारांनी सुपूर्द केल्यानंतर आपल्यापुढे संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक बळकट आणि युवकांना प्रेरणा देणारा पक्ष म्हणून ओळखण्यासाठी आपली जबाबदारी आपण अथक परिश्रम करून पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

Advertisement
0