आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा संतप्त सवाल:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमावादावरुन राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. हे सरकार सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

पाटील काय म्हणाले ?

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे, याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे.

17 तारखेला मविआचा मोर्चा

पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेमध्ये असणाऱ्या असंतोषामुळे महाविकास आघाडी सरकारच्यावतीने 17 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत विचार केला जाणार आहे. कर्नाटक सरकार हल्ले करतेय आणि राज्य सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देत आहे हे दुर्दैवी असल्याची खंतही जयंत पाटील यांनी व्यक्त केली तर. शिंदे - फडणवीस सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड असल्याचेही म्हटले आहे.

राज्यातील वाहनांची कर्नाटकात तोडफोड

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत. अशामध्ये राज्य सरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे, अशा शब्दात जयंत पाटील शिंदे-फडणवीस सरकारवर यांनी हल्लाबोल केला.

गुजरात निवडणुकींवर केले मत व्यक्त

जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि आप यांच्या मतांमध्ये विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये मिळाला आहे, असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...