आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिती शिकले यापेक्षा ते कसे काम करतात, याला महत्त्व आहे. डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीवरुन विरोधाची भूमिका न घेता समजुतीची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. याआधी अजित पवारांनीही मोदींच्या डिग्रीवरुन विरोध न केल्याने चर्चा होताना दिसून येत आहेत.
जयंत पाटील म्हणाले, आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर एकपेक्षा अधिक खोटे गुन्हे दाखल करुन तडीपारीच्या नोटीसा देण्यात आल्या. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बोलायला जे तयार झाले नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. जे ठाणे महापालिकेत नगरसेवक होऊ शकतात त्यांना जाणीवपूर्वक नोटीसा देण्यात आल्या आहेत.
चिकित्सा होणारच
जयंत पाटील म्हणाले, जेपीसीमध्ये सत्तारुढांची संख्या जास्त असते. त्यामुळे त्यांचा निष्कर्ष काढू शकतात. याच कारणामुळे शरद पवार यांनी जेपीसी चौकशीला विरोध केला आहे. डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे नाही. डिग्री आहे असे सांगितल्यावर आणि ती लोकांमध्ये आल्यावर चिकित्सा होणारच. लोक वेगवेगळ्या मार्गांनी तिची चिकित्सा करणारच.
काम महत्त्वाचे
जयंत पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एवढे शिकले आहे त्यामुळे मतदारांनी त्यांना मतदान दिले असेही नाही. मात्र डिग्री समोर आल्यावर तिची चिकित्सा होणारच. डिग्री खरी कि खोटी यावर लोक चर्चा करणार हे स्वभाविकच आहे. मात्र डिग्रीपेक्षा काम महत्त्वाचे असते.
अजित दादांचाही पाठिंबाच
याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मोदींच्या डिग्रीवरुन समर्थन केले आहे. अजित पवार म्हणाले, 2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिले का? मोदींनी देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच दिलं पाहिजे. डिग्रीवर काय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.